कोणत्या वयामध्ये बाळ आपल्या आई-वडिलांना ओळखते? Baby Care

 

Baby Care प्रत्येक आई-वडिलांची अशी इच्छा असते की बाळाने जन्मानंतर लगेचच आपला स्पर्श, आपला आवाज आणि आपल्याला ओळखावं आणि त्यासाठी ते खुप झटपट देखील करत असतात. पण जन्मानंतर एका विशिष्ट वयामधेच बाळ हे आपल्या आई-वडिलांना ओळखु लगते आणि ते वय कोणते आहे हे आज आपण जाणून घेऊयात!

Baby Care
Baby Care


कोणत्या वयामध्ये बाळ आपल्या आई-वडिलांना ओळखते?

बाळाच्या जन्मानंतर त्याला पहिल्यांदा हातात घेतल्यावर होणारा आनंद हा त्याच्या आई वडिलां पेक्षा कोणालाच जास्त समजू शकत नाही. आपल्याच हाड़ामासाचा असलेला तो जीव म्हणून आई व वडिलांची ९ सुरवाती पासुनच त्या बाळाशी घट्ट अशी नाळ जोडलेली गेली असते. बाळ सुद्धा इवल्याश्या डोळ्यांनी टक मक  त्यांच्या नजरेला नजर देऊन बघत असते. 

आई वडील व सगळे हे जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच त्याच्याशी बोलू लागतात तसेच त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवू लागतात. जसा वेळ मिळेल तसा त्याच्याशी संवाद साधन्याचा प्रयत्न करतात. त्यांना असे वाटते की ते आपल्याला ओळखते , आपण त्याला बोललेलं  समजतं. पण असं बिलकुल नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले आई वडील आहेत हेच  त्याला लगेच पहिल्या दिवशीच कळत नाही. त्याला सगळी माणसे ही समानच दिसत व भासत असतात. नवजात बाळ एका विशिष्ट वयामधेच आपल्या आई वडिलांना ओळखायला  लागते. त्या विशिष्ट वयामधेच  त्याला हे समजते कि ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते हेच आहेत आणि त्यांचे स्थान हे आपल्या आयुष्यात देवापेक्षाही खुप मोठं आहे. ते विशिष्ट वय कोणते असते असं तुम्ही विचारताय ना ? 

Baby Care

चला तर आज तुम्हाला संगतोच ..! हेच गुपित  आज आम्ही उलगडणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहे  कि जन्मानंतरचं कोणतं ते  वय आहे की जेव्हा बाळाचे डोळे, मन आणि मेंदूनी बाळ आपल्याला ओळखतं आणि आई वडिल आणि त्यांच्याशी त्याची नाळ ही  आयुष्यभरासाठी जमली  जाते ! चला तर मग जाणून घेऊयात.

नवजात बालकाला आपल्या आईच्या कुशीमधेच सर्वात सुरक्षित जागा आहे असे वाटत असते. कारण जन्माच्या आधी पासून जन्मापर्यंत ते आपल्या आईच्या शरीरातून येणारा सुगंध तसेच ते आपल्या आईच्या आवाजाशी सुद्धा खुप परिचित असते. आणि दिवसभर सुद्धा त्याला आईच  डोळ्यासमोर दिसत असते. हेच कारण आहे कि घरातील इतर कोणत्याही सदस्याच्या आधी बाळ हे आपल्या आईलाच सर्वात प्रथम  ओळखायला शिकते.

हे पण पहा pregnancy Test Naturally at Home.

 जेव्हा बाळ हे तीन महिन्याचं होतं तेव्हा ते विविध चेहऱ्यांमधील फरक ओळखायला शिकु लागते आणि याच काळात ते बाळ आपल्या आईला वडिलांना सर्वात आधी ओळखते. तुम्ही पाहिलेच असाल की लहान असताना बाळ हे सर्वांकडे जाते पण तीन महिन्यानंतर ते ओळखू लागल्याने शक्यतो आईवडिलांना सोडून इतरांकड़े जात नाही 

'कोणत्या वयामध्ये बाळ आपल्या आई-वडिलांना ओळखते?'

रिपोर्ट नुसार खरं तर अजून असे कोणतेही खास संशोधन यावर झालेले नाही ज्यावरून असे सिद्ध होईल कि बाळ नक्की कोणत्या वयात आपल्या वडिलांना ओळखायला सुरुवात करतं. पण बाळ हे गर्भात असल्यापासूनच आपल्या वडिलांचा आवाज ओळखतं कारण आई नंतर वडिलच सर्वात जवळ असतात आणि ते त्यांना पोटातून व बाहेर आल्यावर प्रतिसादही देतं असत. म्हणून डॉक्टर्स असा सल्ला देतात कि वडिलांनी बाळ आईच्या गर्भात Baby Care असल्यापासूनच त्याच्याशी संवाद साधण्यास व चांगले बोलण्यास सुरुवात करावी.

 जेव्हा बाळ हे जन्माला येते तेव्हा त्याची दृष्टी ही धूसर असते आणि ती हळूहळू अंदाजे २ आठवड्यानंतर ती वाढायला सुरु होते त्यानंतर ते आपले आई आणि वडिल यांचे चेहरे ओळखण्यास सुरुवात करते.

वरील माहिती आपल्याला आवडल्यास इतरांना नक्की शेयर करा व आमच्या page ला पुन्हा Visit द्यायला विसरु नका.

हे पण पहा "उन्हाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी"

Post a Comment

0 Comments