डोहाळे कार्यक्रम म्हणजे काय? baby shower decorations


Baby Shower आयुष्यात स्त्री ही पहिल्यांदा आई केव्हा बनते? ज्यावेळी ती एका बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला आईपण प्राप्त होते.आई बाबा होण्याचा प्रवास हा खरच खूप सुखकर आहे.आपल्या पूर्वजांच्या मताप्रमाणे, डोहाळे जेवण हे गरोदर बाईच्या सातव्या महिन्यात केले जाते.परंतु आजकाल नवव्या महिन्या पर्यंत ही हा कार्यक्रम केला जातो. 

डोहाळे कार्यक्रम म्हणजे काय? baby shower decorations

डोहाळे जेवण म्हणजे ही एक आपली परंपराच आहे जी आपल्या रिती-रिवाजाप्रमाणे चालत आलेली आहे. याचा शब्दाचा अर्थ असा निघतो, जी गर्भवती बाई आहे तिला, गरोदरपणात बरेचसे पदार्थ खावेसे वाटतात त्यामुळे या कार्यक्रमात सगळ्या स्रिया मिळून वेगवेगळे पदार्थ एकत्रित घेऊन येऊन गरोदर बाईला खायला देतात.

 गरोदरपणात होणारे बदल आणि वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा ही प्रत्येक स्त्रीला होत असते. डोहाळे जेवण म्हणजे हा एक
Baby Shower
Baby Shower

सोहळाच असतो. येणाऱ्या बाळासाठी पोटात केलेले संस्कार  असतात. तर गरोदर स्त्रीला बाळंतपण आणि मातृत्वासाठी तयार करण्यासाठी मित्र आणि कुटुंब तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. हा क्षण प्रत्येक स्त्रीसाठी खूप भावनिक अनुभव असतो.
baby shower decoration

baby shower decoration




 कार्यक्रमादरम्यान गरोदर बाईला डोक्यापासून ते पायापर्यंत फुलांनी सजवले जाते. तसेच तिला हिरवी साडी हिरव्या बांगड्या, गजरा आणि सजावटीच्या सामानानी सजवले जाते. गरोदर बाईला डोक्याचे किरट, कमरेला बांधलेला कंबर पट्टा आणि चंद्रकोर याने बाईचे रूपच बदलून जाते. या कार्यक्रमात पाळणा ह्याला खूप महत्व आहे. त्याला ही फुलांनी सजवले जाते .स्त्रीचा सातवा महिना हा संकेत देतो की आता इथून पुढे गर्भवती स्त्रीची खूप काळजी घ्यायला पाहिजे. कारण डोहाळे जेवण आणि डिलिव्हरी त्यामध्ये खूप कमी वेळ असतो. डोहाळे जेवणानंतर चे शेवटचे दोन महिने हे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे सातव्या महिन्याला खूप महत्त्व आहे.

 काही पदार्थ-
डोहाळे जेवण

डोहाळे जेवण



 डोहाळे जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ असतात काही तिखट काही आंबट तर काही गोड, याचा आस्वाद हा वेगळाच असतो. हे सगळे एकत्रित पदार्थ गर्भवती स्त्रीला आणले जातात. त्यामध्ये भाकरवाडी,चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळी, सुतार फेणी, करंजी इत्यादी. असे अनेक प्रकारचे पदार्थ असतात. जेवणामध्ये थालीपीठ, खीर, शाबू वडा, पनीर, बासुंदी, कुरमा पुरी. असे अनेक पदार्थ असतात. सगळ्या स्त्रिया मिळून असे पदार्थ घेऊन येतात आणि सजावटीच्या डब्यामध्ये सजवून ठेवतात. या कार्यक्रमात केलेली सजावट आणि गर्भवती स्त्री हे खूप खुलून दिसते.

 फळे (Fruits)

 फळांमध्ये खूप सारे प्रकार आहेत जे डोहाळे जेवणामध्ये आणले जातात. गर्भवती स्त्रीला वेगवेगळी फळे खावीशी वाटतात. फळांमध्ये आंबट गोड जास्त खायला आवडतं.जसं की आंबा,पेरू, संत्री, कलिंगड चिकू,अननस, डाळिंब,चिंच, आवळा, सफरचंद इत्यादी सारे फळे डोहाळे जेवणात आणली जातात.


 baby shower 

 सजावट -

 बेबी शॉवर ,baby shower प्री बेबी शूट हे मॉडर्न पद्धतीने सुरूच आहे. पण आपली रीत सांगते की डोहाळे जेवण हे पूर्वजांनी जसे सांगितले आणले आहे तसेच असायला हवे. गर्भवती स्त्रीला चंद्रावर बसवणं आणि जुला वर बसवणं हा खरच खूप वेगळा अनुभव देतो. फुलांची सजावट तसंच फुग्यांनी गजबजलेला पाळणा हे बघायला सुद्धा खूप सुंदर वाटतं.

 काही खेळ आणि पद्धती-

 डोहाळे जेवण हा सगळा बायकांचा कार्यक्रम असतो. यामध्ये पुरुष हे जास्त नसतातच. गर्भवती बाईला चंद्रावर बसून तिच्यापुढे झिम्मा ,फुगड्या ,आणि नाच गाणं  यांचा खेळ केला जातो. प्रत्येक बाईसाठी हा क्षण खरंच खूप खास असतो.येणाऱ्या बाळासाठी आणि आईसाठी हे अनुभव पहीले असतात.


 भारतात गर्भ लिंग निदान करणं चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे पण आपल्या पूर्वजांनी एक गमतीशीर खेळ आपल्यासमोर आणला आहे  तो म्हणजे. गर्भवती स्त्री पुढे दोन वाट्या ठेवून एका वाटीमध्ये पेढा आणि एका वाटीमध्ये बर्फी ते झाकून ठेवून ते ओळखायचं. आणि त्यामधे काय आहे हे ओळखन्यास होणाऱ्या आईला सांगायचे असते.जे पण काही येईल त्याचा आनंद वाटून घ्यायाचा. या कार्यक्रमात सगल्या गमती जमती असतात. या गमतीजमती गर्भवती मातेसाठी खूप खास असतात.'डोहाळे जेवण म्हणजे काय?'


येणारे पाहुणे नवीन बाळासाठी नव-नवीन वस्तू खरेदी करून घेऊन येतात,  या कार्यक्रमात सर्वजण तिला मेंटली सपोर्ट करत असतात कारण पहिल्या बाळन्तपनात खुप भीती वाटत असते, या मधे सर्व घरच्या लोकांनी व्यवस्थित सपोर्ट केला पाहिजे.

डोहाळे जेवणानंतर गर्भवती स्त्रीला माहेरी पाठवलं जातं. ही पाठवणी यासाठी असते की गर्भवती स्त्री तिच्या आईपाशी जाऊन विश्रांती घेईल. कारण शेवटचे दोन महिने हे अत्यंत महत्त्वाचे असतात. ही पाठवनी आनंदाने केली जाते कारण बाळाच्या आगमनाची वेळ जवळ आलेली असते.

तर चला तर मग तुम्ही पण लागा तयारी ला......"डोहाळे जेवण म्हणजे काय?"


वरील माहिती आपल्याला पसंद पडल्यास नक्की आपल्या मित्र मंडळी , कुटुंबामधे शेयर करा,  तसेच आमच्या page ला पुन्हा भेट दयायला विसरु नका , 

(हे पण पहा - बेबी केअर इन marathi)

Post a Comment

0 Comments